adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमदार किशोरजी दराडे यांच्या आमदार निधीतून जे.ई. स्कूल मुक्ताईनगरला प्रोजेक्टरची भेट

आमदार किशोरजी दराडे यांच्या आमदार निधीतून जे.ई. स्कूल मुक्ताईनगरला प्रोजेक्टरची भेट   सतिश गायकवाड मुक्ताईनगर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

आमदार किशोरजी दराडे यांच्या आमदार निधीतून जे.ई. स्कूल मुक्ताईनगरला प्रोजेक्टरची भेट  


सतिश गायकवाड मुक्ताईनगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे आज नाशिक विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांच्या आमदार निधीतून विद्यालयाला आधुनिक प्रोजेक्टर भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा लाभ होणार असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. बी. वंजारी यांनी केले. यावेळी सदिच्छा भेटीसाठी हरीषजी मुंडे (स्वीय सहाय्यक, आमदार किशोरजी दराडे), आप्पासाहेब संभाजीराव पाटील (माजी अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती शिक्षक पतपेढी), घुगे सर, महेंद्र पाटील (जिल्हा सरचिटणीस, शिक्षक सेना) तसेच मुक्ताईनगर तालुका समन्वयक सुनील आवटे उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी केले. यावेळी उपप्राचार्या व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार किशोरजी दराडे आणि संभाजीराव पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण व आपली संपूर्ण टीम सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी एस. बी. वंजारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments