निलंगा बस आगाराच्या ताफ्यात पाच नवीन एसटी बसांचा समावेश...प्रवासी सेवेला मिळणार बळ.. लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गाय...
निलंगा बस आगाराच्या ताफ्यात पाच नवीन एसटी बसांचा समावेश...प्रवासी सेवेला मिळणार बळ..
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा बस आगाराच्या ताफ्यात पाच नवीन एसटी बसांचा समावेश करण्यात आला असून, शनिवारी त्यांचे लोकार्पण करण्यात आले. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर या बसांचा समावेश करण्यात आल्याने तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक नियमित, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नवीन बसांचे लोकार्पण निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयराज हलगरकर आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन बसांचा समावेश उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
यासंदर्भात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून निलंगा बस आगारासाठी या बस उपलब्ध झाल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. भविष्यात प्रवाशांच्या गरजेनुसार बससेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक ईश्वर पाटील, नगरसेवक लक्ष्मण सगरे, सुमित इनानी, पिंटू पांचाळ, आगार प्रमुख अनिल बिडवे ,संबंधित अधिकारी, माजी नगरसेवक शरद पेठकर,राहुल बिरादार बस चालक, वाहक तसेच एसटी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. नवीन बसांच्या समावेशामुळे निलंगा बस आगाराच्या सेवाक्षमतेत वाढ होणार असून, विविध मार्गांवरील बसफेऱ्या अधिक प्रभावीपणे नियोजित करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments