adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निर्वाणा फाउंडेशन व एस. एम. कॉलेजमध्ये समाजसेवेसाठी सहयोग करार 'PADA CARE' उपक्रमातून NSS विद्यार्थी पाड्यावरील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी करणार स्वयंसेवा

 निर्वाणा फाउंडेशन व एस. एम. कॉलेजमध्ये समाजसेवेसाठी सहयोग करार 'PADA CARE' उपक्रमातून NSS विद्यार्थी पाड्यावरील मुलांच्या शैक्षणिक ...

 निर्वाणा फाउंडेशन व एस. एम. कॉलेजमध्ये समाजसेवेसाठी सहयोग करार

'PADA CARE' उपक्रमातून NSS विद्यार्थी पाड्यावरील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी करणार स्वयंसेवा


अंतुर्ली ता‌. मुक्ताईनगर : किरण धायले

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर :-  दि. १५ जुलै २०२६ : पाड्यावरील तसेच वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन व शैक्षणिक अडचणींवर मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या निर्वाणा फाउंडेशन, अंतुर्ली यांनी समाजसेवेच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी एस. एम. कॉलेज, मुक्ताईनगर यांच्यासोबत Letter of Collaboration केला आहे.

दि. १५ जुलै २०२६ रोजी झालेल्या या सहयोग कराराचा मुख्य उद्देश समाजसेवेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव मिळवून देणे हा आहे. या सहयोगाअंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मधील विद्यार्थी निर्वाणा फाउंडेशनच्या 'PADA CARE' उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणार आहेत.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थी पाड्यावरील मुलांना शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणार आहेत. तसेच निर्वाणा फाउंडेशनतर्फे स्वयंसेवक विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वयंसेवा पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी निर्वाणा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. प्रफुल किशोर मेढे तसेच ॲड. धीरज पानपाटील यांनी एस. एम. कॉलेज, मुक्ताईनगर येथे भेट देऊन महाविद्यालयाच्या प्राचार्य व प्राध्यापक वर्गाला सहयोगाचे निवेदन सादर केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आय. डी. पाटील, प्रा. डॉ. पंचशीला वाघमारे, प्रा. डॉ. रमेश शेवाळे, प्रा. के. पी. पाटील, प्रा. देशमुख तसेच महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

या सहयोगामुळे समाजसेवेची जाणीव असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव मिळणार असून पाड्यावरील मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments