जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी प्रा.सतिश गायकवाड मुक्ताई...
जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका श्रीमती व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, व्ही. डी. बऱ्हाटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती एल. व्ही. पाटील, सौ. आर. बी. महाजन आणि आर. पी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे केले.
यावेळी आर. पी. पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रभक्ती, शिक्षणविषयक विचार आणि समाजजागृतीच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर सौ. आर. बी. महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदा, समाजप्रबोधनाचे कार्य आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानावर प्रकाश टाकला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी (लहान गट) आणि इयत्ता आठवी ते दहावी (मोठा गट) अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक समता, देशभक्ती तसेच महापुरुषांच्या विचारांचे जतन व आचरण करण्याची प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments