adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीत जग बदलण्याची धमक - प्रा रत्नाकर कोळी

 अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीत जग बदलण्याची धमक - प्रा रत्नाकर कोळी  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्र...

 अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीत जग बदलण्याची धमक - प्रा रत्नाकर कोळी 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे इतिहास व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी  महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ एस आर गायकवाड, उपप्राचार्य डॉ हेमंत भंगाळे तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा रत्नाकर कोळी उपस्थित होते. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव या आपल्या  लोकप्रिय रचनेप्रमाणेच आण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला धार होती म्हणूनच तर कादंबरी,कथा, वगनाट्य, प्रवासवर्णन, नाटक, पोवाडे,लावणी, छक्कड अशा नानाविध लेखनप्रकार हाताळत अण्णाभाऊंनी विपूल साहित्य संपदा निर्माण केली. ही पृथ्वी शेषनागाच्या फनावर  नसुन श्रमिक कष्टकरींच्या तळहातावर पेलली आहे असे सांगून प्रा रत्नाकर कोळी यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदानावर देखील प्रकाश टाकला.

अध्यक्षीय मनोगतात प्रा एम डी खैरनार यांनी आण्णाभाऊ साठे दलित साहित्याचे प्रणेते असल्याचे सांगून, त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावर देखील प्रकाश टाकला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा कमालीचा देशाभिमान बाळगणारे लोकमान्य टिळक म्हणजे तरुणाईसाठी आदर्श आहेत असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सुत्रसंचलन इतिहास विभागाचे प्रा डॉ संतोष जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा पंकज बोदडे व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा अरुण पावरा यांनी परिश्रम घेतले..  याप्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा आर डी पवार, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा भागवत पाटील तसेच सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..

No comments