adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेडच्या श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेत राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 हातेडच्या श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेत राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद  हातेड, प्रतिनिधी :  (संपादक -:- हेमकां...

 हातेडच्या श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेत राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 


हातेड, प्रतिनिधी : 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हातेड येथील श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेत शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांना वाव दिला.

रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या माध्यमातून कल्पकता व सर्जनशीलतेचे दर्शन घडविले, तर हस्ताक्षर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुंदर व सुबक अक्षरांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण होण्यासोबतच त्यांच्या कलात्मक गुणांना प्रोत्साहन मिळाले.  


विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळेतील शिक्षकांनीदेखील या उपक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांसोबत मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप बोरसे सर, खैरनार सर, अमृत पाटील सर, संदीप सनेर सर, विशेष शिक्षिका मंदाकिनी मॅडम, शालेय व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक यांनी विशेष मेहनत घेतली.

सदर राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेचे आयोजन रंगोत्सव, मुंबई या संस्थेच्या चोपडा तालुका इव्हेंट डायरेक्टर तथा हातेड येथील उपशिक्षिका श्रीमती रेखा अशोक पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने पालक व शाळा परिवारातून समाधान व्यक्त करण्यात आले. 




No comments