adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाटखेडा येथे ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; ऐक्य आणि बंधुत्वाचा दिला संदेश युवकांनी पेढे-मिठाई वाटून साजरा केला पैगंबरांचा प्रकटदिन

 भाटखेडा येथे ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; ऐक्य आणि बंधुत्वाचा दिला संदेश युवकांनी पेढे-मिठाई वाटून साजरा केला पैगंबरांचा प्रकटदिन  रावेर ...

 भाटखेडा येथे ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; ऐक्य आणि बंधुत्वाचा दिला संदेश

युवकांनी पेढे-मिठाई वाटून साजरा केला पैगंबरांचा प्रकटदिन


 रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

ईद-ए-मिलाद-उन-नबी या पवित्र पर्वानिमित्त रावेर तालुक्यातील भाटखेडा गावात मोहम्मद पैगंबर यांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात धार्मिक उल्हास, ऐक्य आणि बंधुत्वाचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळी मशिदीत विशेष प्रार्थनेनंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. हात हिरवे झेंडे, बॅनर आणि पताका घेऊन युवकांनी "नारा-ए-तकबीर, या रसूल अल्लाह" च्या जयघोषात संपूर्ण मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली. यावेळी नाते पाक आणि धार्मिक गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.

मिरवणुकीदरम्यान युवकांनी नागरिकांना पेढे बुंदी मिठाईचे वाटप केले.यामुळे वातावरण आणखी उत्साही झाले.

या मिरवणुकीला केवळ धार्मिक महत्त्व नसून सामाजिक ऐक्याचा संदेशही देणारा कार्यक्रम ठरला. मशिदीचे मौलवी  सहभागी झाले होते. यामुळे गावातील धार्मिक सलोखा दिसून आला.

 चांदशाह वली दर्गाहात विशेष दुआ करून करण्यात आली.सायंकाळी मगरीब च्या नमाज पठणानंतर उपस्थितांना बासुंदी पेय वाटप करण्यात आले यावेळी 

 भाटखेडा गावातील पंच कमिटी  अध्यक्ष दिलीप तडवी सुलेमान तडवी शाहमद तडवी अल्ताफ तडवी,  मो ,अंकरम साहब नशीर वस्ताद,गुलशेर तडवी, रफिक मेंबर, रमजान तडवी सलीम तडवी इदबार वस्ताद अकबर तडवी नजीर तडवी समाज बांधव उपस्थित होते

No comments