adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्राचार्य डी. पी. सपकाळे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

  प्राचार्य डी. पी. सपकाळे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेलापूर बु॥ श्री अनंतराव ...

 प्राचार्य डी. पी. सपकाळे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेलापूर बु॥ श्री अनंतराव सराफ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शेलापूर बु॥ येथील प्राचार्य श्री डी. पी. सपकाळे सर नियत वयोमानानुसार 34 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.

सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री एस. आर. सावळे सर, प्रमुख अतिथी मा. श्री श्रीपाददादा सराफ, मा. श्री आत्मारामभाऊ सावळे, सेवानिवृत्त शिक्षक श्री के. एम. सराफ सर, श्री संजयजी जोहरे कलाशिक्षक पुणे, श्री रविंद्रजी घुळे ह्या मान्यवरांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन व माता सरस्वती पूजन केले. माता सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली. 


मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. सत्कार मुर्ती श्री डी. पी. सपकाळे सर यांचा ग्रामसेवा समितीचे उपाध्यक्ष मा. श्री आत्मारामभाऊ सावळे व व्यवस्थापक मा. श्री श्रीपाददादा सराफ यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच त्यांनी आपल्या भाषणात संस्थेबद्दल, शाळेबद्दल विद्यार्थ्यांप्रती श्री सपकाळे सरांचे Devotion to duty प्रत्यक्ष पाहिले असल्याचे उदाहरणे देऊन सांगीतले व भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री सावळेसर यांनी शिक्षक सेवक मित्र मंडळतर्फे सत्कार मुर्तीना वस्त्रे, रुमाल, टोपी,श्रीफळ,  पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्यात व आपल्या भाषणात सत्कार मुर्तीचे प्रामाणिक कार्याचा लेखाजोखा मांडला.

सत्कार मुर्तीच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा सपकाळे व त्यांचे कुटुंबीय मनोज सपकाळे, सौ. पल्लवी सपकाळे, संयोग सपकाळे, सौ. घुळे, कु तनुश्री सपकाळे यांचा सत्कार सौ पाटील मॅडम व प्रा. सौ सावळे मॅडम यांनी केला. तसेच जावई श्री योगेशराव प्रभाकर दोडे उद्योजक जळगाव यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

श्री अनंतराव सराफ विद्यालय शेलापूर बु. शिक्षक सेवक सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष श्री जी. पी. भोपळे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच सेवा निवृत्त शिक्षक श्री के. एम. सराफ सर यांनी सत्कार मुर्तीना *सन्मानपत्र व पुष्प गुच्छ* देत सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याला मंगल शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वर्ग 8 मधील कु. सृष्टी वाढे तर वर्ग 10 मधून मुस्कानखान इम्रानखान पठाण यांनी सत्कार मुर्तीबद्दल शिस्त, अध्यापनातील मनोरंजकता आपल्या भाषणामधून सांगितली.

कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री मात्रे सर, शिक्षक मित्र मंडळाचे कोषाध्यक्ष श्री एन.जी. इंगळे सर, सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री एम एल क्षिरसागर सर, श्री आर सी भटकर सर, श्री एन के कोलते सर, श्री कवळे सर अटल टिंकरिंग लॅबचे इन्चार्ज श्री वाय आर जैस्वाल सर, श्री ए. आर जोशी सर, सी बी सोळंके सर, क्रीडा शिक्षक श्री किन्होळकर सर, श्री पंडित बोरसे बाबुजी, श्री सुरेश खराटे, श्री योगेश खराटे, श्री भरत मोरे, स्कूल बसचे चालक मालक श्री राजेंद्र घाटे, बजरंग दल तथा सामाजिक कार्यकर्ते श्री लखन सपकाळ, समाधान सपकाळ, सेवा निवृत्त प्राध्यापक श्री व्ही एम सराफ सर यांनी सत्कार मुर्तीचा सत्कार करत शुभेच्छा दिल्यात.

श्री एस डी पाटील सर यांनी आपले मनोगत विनोदी शैलीतून सत्कार मुर्तींच्या अनेक सद्गुणांचे पैलू उलगडले.

सत्काराला उत्तर देतांना श्री सपकाळे सर यांनी संस्था, संस्थेचे व्यवस्थापक मंडळ, गावकरी, परिसरातील पालक, शिक्षकवृंद या सर्वांचे मनापासून आभार मानले व विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्यासाठीचे मुलमंत्र दिलेत.

कार्यक्रमाचे कविता व चारोळी युक्त सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग उपप्रमुख तथा शिक्षक प्रतिनिधी श्री एन. जी. इंगळे सर यांनी तर मनोगत व आभार प्रदर्शन श्री एम एल क्षिरसागर सर यांनी केले. सहभोजना नंतर सरांना सेवा निवृत्ती निरोप देण्यात आला.

No comments