यावल-रावेर परिसरातील कुंभार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक पुरस्कार सोहळा भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल-रावेर...
यावल-रावेर परिसरातील कुंभार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक पुरस्कार सोहळा
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल-रावेर परिसरातील कुंभार समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच सामाजिक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता यावल येथील बोरावल गेट परिसरातील पद्मावती हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य संस्थापक कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर राहणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद जीवराम महाजन, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पंडित पाटील, रमाकांत क्षीरसागर यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

No comments