adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीरामपूर नगरपरिषदेचा हरित श्रीरामपूरचा उपक्रम वाखाणण्याजोगा - आमदार हेमंत ओगले शालेय विद्यार्थ्यांना ११ हजार वृक्षाचे होणार वाटप

 श्रीरामपूर नगरपरिषदेचा हरित श्रीरामपूरचा उपक्रम वाखाणण्याजोगा - आमदार हेमंत ओगले  शालेय विद्यार्थ्यांना ११ हजार वृक्षाचे होणार वाटप   शौकतभ...

 श्रीरामपूर नगरपरिषदेचा हरित श्रीरामपूरचा उपक्रम वाखाणण्याजोगा - आमदार हेमंत ओगले

 शालेय विद्यार्थ्यांना ११ हजार वृक्षाचे होणार वाटप  


शौकतभाई शेख/ श्रीरामपूर:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर नगरपरिषदेने हरित श्रीरामपूर सुरु केलेला उपक्रम वाखण्याजोगा असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले आहे.

      श्रीरामपूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या सुमारे ११ हजार शालेय विद्यार्थांना वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते करण्यात आला.

      श्रीरामपूर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४,५ आणि ७ या ठिकाणी आमदार ओगले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, उपनगराध्यक्ष कांचन सानप, मुख्याधिकारी मनोज उकिरडे, गटनेते मुजफ्फर शेख, सभापती रईस जहागिरदार, दिपक वमने, योगेश जाधव, नगरसेविका आशा परदेशी, सोनिया कक्कड, योगिता नागले , वैशाली पोटे, कलीम कुरेशी, गोपाल लिंगायत, पंडित बोंबले, मुन्ना पठाण, रज्जाक पठाण, उपस्थित होते.

      यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा योजने मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात येत असून विद्यार्थ्याने झाड लावताना व्हिडिओ तयार करायचा आहे आणि सदरील व्हिडिओ व्हाट्सअप वर टाकावा या मोहिमेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्याना बक्षीसे देण्यात येणार आहे. निश्चितच या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्याच्या मनात देखील हरित श्रीरामपूर ही संकल्पना रुजली जाईल असे देखील ससाणे यांनी म्हटले आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments