adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे आज मध्यरात्री ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा

फैजपूर येथे आज मध्यरात्री ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा १९३६ च्या ऐतिहासिक फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या भूमीवर स्वातंत्र्यदिनाचे स्वागत; नागरिका...

फैजपूर येथे आज मध्यरात्री ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा

१९३६ च्या ऐतिहासिक फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या भूमीवर स्वातंत्र्यदिनाचे स्वागत; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

काल्पनिक फाईल फोटो 

 इदू पिंजारी फैजपुर 

संपादक – हेमकांत गायकवाड

फैजपूर येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या १९३६ च्या ऐतिहासिक फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या भूमीवर शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा स्वातंत्र्य स्मारक, छत्री चौक, फैजपूर येथे होणार असून, नागरिकांनी रात्री १०.३० वाजता एकत्रित उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मध्यरात्री स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करत राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे.

ऐतिहासिक परंपरेला यंदाही उजाळा

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात फैजपूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सन १९३६ मध्ये याच भूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशन पार पडले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणाऱ्या अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीने ही भूमी पावन झाली होती.

याच ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत दरवर्षी मध्यरात्री ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, बलिदान आणि देशभक्तीचे स्मरण करण्याची परंपरा फैजपूरमध्ये जपली जात आहे.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

यावर्षीचा ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा माजी आमदार शिरीषदादा चौधरी व माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रभैय्या पाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड. एव्हरेस्ट राठोड, प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हारून नदवी, प्रदेश सचिव प्रवीण सरवाडे, जळगाव शहराध्यक्ष जमील शेख तसेच जळगाव ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कार्यक्रमाचे निमंत्रक धनंजय चौधरी, जिल्हाध्यक्ष जळगाव ग्रामीण पूर्व; प्रशांत पाटील, ब्लॉक अध्यक्ष यावल ग्रामीण; यशवंत महाजन, ब्लॉक अध्यक्ष रावेर ग्रामीण; रियाज शेख, शहराध्यक्ष फैजपूर; हकीम सेठ, शहराध्यक्ष यावल आणि संग्रक्षक तायडे, शहराध्यक्ष रावेर यांनी नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करण्यासाठी फैजपूरकर सज्ज झाले आहेत.

No comments