adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा पोलिसांची गोवंशाच्या अवैध वाहतूक प्रकरणी धडक कारवाई! चारचाकी वाहनासह २ आरोपी ताब्यात ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त.

  सावदा पोलिसांची  गोवंशाच्या अवैध वाहतूक प्रकरणी धडक कारवाई! चारचाकी  वाहनासह २ आरोपी ताब्यात   ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त.  मुबारक त...

 सावदा पोलिसांची  गोवंशाच्या अवैध वाहतूक प्रकरणी धडक कारवाई! चारचाकी  वाहनासह २ आरोपी ताब्यात 

३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त.


 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सावदा शहरात गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर व निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या वाहनावर सावदा पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन गोवंश जिवंत सुटका करून गोशाळेत रवाना केले आहेत.

घटनेची सविस्तर माहिती अशी दिनांक २२/०८/२०२६ रोजी रात्री सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहसीन रहेमानखा पठाण व पोहेकॉ निलेश बाविस्कर हे पोलीस ठाण्यात हजर असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सावदा शहरातील ख्वाजा नगरसमोरील मरीमाता मंदिराजवळून गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करणारी एक गाडी जाणार असल्याचे समजले.

पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे  तात्काळ रात्री १०:५० वाजता ख्वाजा नगरसमोरील मरीमाता मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी ख्वाजा नगरकडून येणारे एक पिवळ्या रंगाचे टाटा एस (छोटा हत्ती) चारचाकी वाहन (क्र. MH.48.AG.5804) संशयास्पद रित्या येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या बॉडीमध्ये २ गोवंश (एक गाय व एक गो-हे) अत्यंत निर्दयतेने, हालचालीसाठी कोणतीही पुरेशी जागा न ठेवता बांधलेल्या स्थितीत आढळून आले.व 

आरोपीकडे जनावरांच्या खरेदी-विक्रीचे किंवा वाहतुकीचे कोणतेही वैध कागदपत्रे व परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून जनावरांची तपासणी केली व सुटका केलेल्या दोन्ही गोवंशांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत पाठवले आहे.

आरोपी:

1) अदनान शेख शगीर कुरेशी (वय 19, रा. इस्लामपुरा, खाटकीवाडा, सावदा, ता. रावेर) - चालक.

२) निलेश रमेश पाटील (वय ४४, रा. प्लॉट भागात टेलिफोन एक्सेंज जवळ, सावदा, ता. रावेर). यांना ताब्यात घेतले व वाहनासह दोन गोवंश जप्त केले यामध्ये एकूण किंमत ३,३०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व

१)  १५.०००/- रुपये किमतीची १ तांबड्या रंगाची गाय (वय सुमारे ८ वर्षे).

२) सुमारे १५.०००/- रुपये किमतीचा १ पांढऱ्या रंगाचा गोऱ्हा (वय सुमारे ५ वर्षे).

३) सुमारे ३,०००,०००/- (तीन लाख) रुपये किमतीचे पिवळ्या रंगाचे टाटा एस (TATA YES ASE) वाहन (क्र. MH.48.AG.5804).

याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात F.I.R. क्रमांक ०२१९/२०२६ अन्वये आरोपींविरुद्ध खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे: महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा २०१५) चे कलम ५ (अ), ९. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (d), ११(१)(g). महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे कलम ८३, १७७. सदरची धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उप विभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे स. पो. नि. गणेश फड, पोहेकॉ मोहसीन पठाण, निलेश बाविस्कर, पो.ना. जाकीर मन्सूरी, सुनील सैंदाणे अशा पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, पुढील तपास पो. ना. जाकीर मन्सूरी हे करत आहेत.

No comments