adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावलमध्ये भव्य तिरंगा यात्रेने राष्ट्रभक्तीचा जागर

 यावलमध्ये भव्य तिरंगा यात्रेने राष्ट्रभक्तीचा जागर  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर...

 यावलमध्ये भव्य तिरंगा यात्रेने राष्ट्रभक्तीचा जागर 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ या आवाहनाला प्रतिसाद देत समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक, व्यासनगरी (यावल) यांच्या वतीने पद्मावती मंगल कार्यालय येथून शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या यात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण यावल शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

यात्रेपूर्वी भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

या तिरंगा यात्रेचे विशेष आकर्षण विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध महापुरुष, स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेचे प्रात्यक्षिक ठरले. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून भारतीय इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रभक्तीची सुंदर अनुभूती उपस्थितांना करून दिली. 


यात्रेदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने शहरात देशप्रेमाचा उत्साह पाहायला मिळाला.

या ऐतिहासिक तिरंगा यात्रेत आमदार अमोल कल्पना हरिभाऊ जावळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले. राष्ट्रभक्ती, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचा गौरव जपत यावलकरांनी देशप्रेमाची भव्य साक्ष दिली.

या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणारे आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी तसेच सहभागी झालेल्या सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले. ‘तिरंगा हा आपल्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि राष्ट्रसेवेच्या संकल्पाचा गौरवशाली प्रतीक आहे,’ असा संदेश यावेळी देण्यात आला.

No comments