फैजपूरच्या मुन्सिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र दिवस साजरा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज 15 ऑगस्ट 20...
फैजपूरच्या मुन्सिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र दिवस साजरा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनानिमित्त म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर, येथे शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती श्री. महेंद्र अशोक मंडवाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा शपथ, तंबाखू मुक्त शपथ, साक्षरता शपथ, कॉपीमुक्त शपथ तसेच देशभक्तीपर गीत व भाषण सादर करण्यात आले. त्याचबरोबर देशभक्तीपर गीतांवर संगीतमय कवायत घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.अशा तऱ्हेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात फैजपूर नगराच्या नगराध्यक्षा सौ.दामिनी पवन सराफ, उपनगराध्यक्ष श्री. विनोद चौधरी, शालेय समिती अध्यक्ष श्री. सिद्धेश्वर वाघुळदे तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. के.टी.तळेले सर, पर्यवेक्षक श्री एस. ओ. सराफ सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments