adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ३० विद्यार्थ्यांना डिजिटल पाट्यांचे वाटप सुनंदन बहुउद्देशीय संस्थेचा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ३० विद्यार्थ्यांना डिजिटल पाट्यांचे वाटप सुनंदन बहुउद्देशीय संस्थेचा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम उत्साहात संपन...

 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ३० विद्यार्थ्यांना डिजिटल पाट्यांचे वाटप

सुनंदन बहुउद्देशीय संस्थेचा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न  

शामसुंदर सोनवणे वि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुनंदन बहुउद्देशीय संस्था, हातेड यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, हातेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे, BTS परीक्षेत यशस्वी झालेले तसेच विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण १३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, स्टडी टेबल तसेच स्मृतिचिन्ह मेडल देऊन गौरविण्यात आले. 


विशेष म्हणजे, स्वर्गीय प्रा. श्रीकांत भिकनराव बाविस्कर, चहार्डी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व १३ गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह मेडल प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला भावनिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी शाळेतील गरजू ३० विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डिजिटल पाट्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, स्टडी टेबल, पाटी आदी शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास सुनंदन बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, गावातील तसेच परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणे आणि समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, या सामाजिक बांधिलकीतून सुनंदन बहुउद्देशीय संस्थेने हा उपक्रम राबविला. 


या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा प्रशासन, विद्यार्थी व पालकांच्या वतीने सुनंदन बहुउद्देशीय संस्था आणि संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढण्याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांना अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“गुणवंतांचा सन्मान, शिक्षणाला प्रोत्साहन आणि उज्ज्वल भविष्याची निर्मिती — हाच सुनंदन संस्थेचा संकल्प!” 


No comments