पक्ष संघटनात्मक बांधणी मजबूत करा -उपनेते गुलाब वाघ चोपडा प्रतिनिधी : चंद्रकांत पाटील (संपादक : हेमकांत गायकवाड) आज पक्षाला महायुती सरकार वि...
पक्ष संघटनात्मक बांधणी मजबूत करा -उपनेते गुलाब वाघ
चोपडा प्रतिनिधी : चंद्रकांत पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आज पक्षाला महायुती सरकार विविध माध्यमातून कमकुवत बनवत आहे पक्षातील विविध नेते कार्यकर्ते यांचे फोडाफोडी च राजकारण करत आहे तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसेनेच्या ढाण्या वाघासाठी प्रयत्नची परकाष्ठा करीत आहे अश्या स्थितीत आपल्या शिवसैनिकानी आलेले संकटावर मात करून पक्ष संघटनात्मक बांधणी साठी प्रयत्नची परकाष्ठा करावी असे आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते गुलाब वाघ यांनी चोपडा विश्राम गृहात शिवसेना पदधिकारी बैठकीत केले.
यावेळी पुढे बोलतांना म्हटले की,हिंदु हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षांनिमित्त आपल्या विविध उपक्रम करायचे असून त्यासाठी आपल्या नियोजन करायचे आहे.तसेच भारतीय निवडणूक आयोगातर्फे एसआरआय फॉर्म भरणे चालू आहे आपल्या शिवसैनिकांनी जास्तीत जास्त फार्म भरवून मतदान वाढीसाठी प्रयत्न करावे.तसेच आपल्या शिवसेना पदाधिकारी यांनी आपल्या शहारात गावागावात जाऊन शाखा सुरु कराव्यात नवीन पदाधिकारी यांची नेमणूक करून त्यांना पद द्यावे आगामी निवडणुका साठी मोर्चे बांधणी करावी असे आव्हान यावेळी करण्यात आले.
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे यांनी बैठकीत मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा,उपजिल्हा प्रमुख गोपाल चौधरी,महिला जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील,विधानसभा सभा क्षेत्रप्रमुख सुनिल बडगुजर,तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे तालुका संघटक बाळू कोळी,शहर प्रमुख शशी कन्हैया, महिला शहर प्रमुख जयश्री बडगुजर, चोपडा शिवसैनिक प्रकाश पाटील,अलकेश महाजन,पंकज चौधरी,प्रवीण लोहार गणेश कन्हैया, दिनेश चौधरी,मनोहर महाजन, संदीप कोळी,नाना कोळी,मोनू पाटील,छोटू पाटील, गोपाल पाटील,विजय पाटील,विजय बोरसे,जानकीराम कोळी,अशोक कंखरे,दत्ता नेवे,रविंद्र शिंपी, सुकलाल कोळी,अनिल राजपूत, एकनाथ कोळी, सुनिल सोनवणे शालिक बोरसे,मुकेश सोनवणे,देविदास मगरे यासह शिवसैनिक उपस्थित होते.


No comments