adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपोषणाचा दणका! अवैध ताडीचा बाजार उद्ध्वस्त; १० गुन्हे १० अटक २ सराईतांवर हद्दपारीचा प्रस्ताव अवैध धंद्याला हादरा; ९१० लिटर ताडी जप्त व नष्ट ५० हजारांचे बंधपत्र; दोघांवर कारवाई

  उपोषणाचा दणका! अवैध ताडीचा बाजार उद्ध्वस्त; १० गुन्हे १० अटक २ सराईतांवर हद्दपारीचा प्रस्ताव अवैध धंद्याला हादरा; ९१० लिटर ताडी जप्त व नष्...

 उपोषणाचा दणका! अवैध ताडीचा बाजार उद्ध्वस्त; १० गुन्हे १० अटक २ सराईतांवर हद्दपारीचा प्रस्ताव

अवैध धंद्याला हादरा; ९१० लिटर ताडी जप्त व नष्ट ५० हजारांचे बंधपत्र; दोघांवर कारवाई 

निलंगा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

निलंगा : कासार सिरशी (ता. निलंगा) येथील ग्रामदैवत श्री करिबसवेश्वर मठ परिसर आणि मुख्य बाजारपेठे जवळ सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध ताडी विक्री विरोधात अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. उपोषणाचा इशारा आणि त्यानंतर सुरू झालेल्या आमरण उपोषणाची दखल घेत तब्बल १० गुन्हे दाखल करून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत ९१० लिटर ताडी जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ३४ हजार रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

अवैध ताडी विक्री विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन देऊन १० ऑगस्ट २०२६ पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू होताच प्रशासनाचा दणका!

समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांच्या आदेशाने, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांच्या निगराणीखाली तसेच मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १० ऑगस्ट पासून उपोषण सुरू करण्यात आले.

उपोषणाची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कासार सिरशी परिसरातील अवैध ताडी विक्रीविरोधात कारवाईचा अहवाल सादर केला. एकूण १० गुन्हे दाखल करून १० आरोपींना अटक करण्यात आल्याचे अधिकृत पत्रातून स्पष्ट झाले आहे.

दोन सराईतांवर कलम ९३ अंतर्गत प्रस्ताव

अवैध ताडी विक्री करणाऱ्या दोन सराईत आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी, निलंगा यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय दोन्ही आरोपींकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांचे चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

दरम्यान, यापुढेही अवैध ताडी विक्री विरोधात वारंवार कारवाई करून हा प्रकार बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

कारवाईनंतर उपोषण स्थगित

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर.एस. कोतवाल यांनी लेखी पत्राद्वारे कारवाईची माहिती दिल्यानंतर प्रशासनास सहकार्य करण्याच्या भूमिकेतून १० ऑगस्टपासून सुरू असलेले आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

No comments