adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

व्यसन करू नका अभ्यासाकडे लक्ष द्या :- सचीन नागरे

  व्यसन करू नका अभ्यासाकडे लक्ष द्या :- सचीन नागरे   अडावद प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद :- व्यसन करू नका अभ्यासाकडे लक्ष द्य...

 व्यसन करू नका अभ्यासाकडे लक्ष द्या :- सचीन नागरे  


अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद :- व्यसन करू नका अभ्यासाकडे लक्ष द्या आणि सोशल मिडीयावर काहीच शेर करू नका घरी आई वडिलांशी चांगले वागा  असे आवाहन येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचीन नागरे यांनी विद्यार्थी सुरक्षा व व्यसन मुक्त या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले येथील सार्वजानिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा . व व्यसन मुक्त या विषयावर श्री नागरे यांनी माहिती दिली यावेळी येथील मुख्याध्यापक अशोक कदम पर्यवेक्षक एम जी पाटील जेष्ठ शिक्षक आर टी मोरे  व्हि एच पानमन श्रीमती नलिनी पाटील यांनी सचिन नागरे व पोलीस कॉन्टेबल दिव्या मराठे यांचा सत्कार करण्यात आला  यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचीन नागरे व दिव्या मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की . कोणतेही फोटो अपडेट करू नका  तुम्ही तुमच्या पायावर उभे रहा  

आई वडिल व शाळेचे व शिक्षकाचे  नाव गावाचे  नाव   मोठे झाले पाहिजे  चांगले वागा रस्त्याने येता जातांना कोणाशी बोलू नका  शाळेतुन बाहेर निघू नका शाळा सुटल्यावर च घरी जा  आई वडिलांना सविस्तर माहिती सांगा खोटे बोलू नका   मोबाईलचा वापर जास्त करू नका अभ्यासा कडे लक्ष द्या अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्याना सविस्तर सांगितली यावेळी   मुख्याध्यापक अशोक कदम यांनी ही विद्यार्थ्यांना व्यसना विषयी व मोबाईल या विषयी सविस्तर माहिती सांगितली  यावेळी इयत्ता    पाचवी ते दहावीचे . बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती नलिनी पाटील यांनी केले तर आभार अशोक कदम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी  शाळेतील   सर्व  शिक्षक व शिक्षीका  व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सरकार्य केले 


फोटो कॅप्शन  अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस उपनिरीक्षक सचीन नागरे  श्रीमती दिव्या  मराठे मुख्याध्यापक अशोक कदम एम जी पाटील आर टी मोरे आदी मान्यवर

No comments