मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात इको क्लब तर्फे वृक्षारोपण जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदे...
मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात इको क्लब तर्फे वृक्षारोपण
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिर आणि ‘दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थी व पालकांना देखील वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाविषयी मार्गदर्शन करून या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर, इको क्लबचे समन्वयक सुनिल दाभाडे, तसेच हर्षा चौधरी, मीरा चौधरी, वैशाली साळुंके, मनोजकुमार बावस्कर आणि योगिता घोलाणे यांनी सहभाग घेत वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावे आणि ‘एक विद्यार्थी–एक झाड’, ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून निसर्गाशी नाते दृढ व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला.
शाळेत इको क्लब समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या विद्यार्थी अध्यक्ष पदी मंजिरी पाटील यांची निवड करण्यात आली. इको क्लबच्या प्रमुख म्हणून मुख्याध्यापिका माया अंबटकर, तर इको क्लबचे समन्वयक म्हणून सुनिल दाभाडे जबाबदारी सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागातून वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, माध्यमिक मुख्याध्यापिका अलका महाजन यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी इको क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी अभिनंदन केले.वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिराने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

No comments