फैजपूर युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा यांच्यावतीने रक्तदान शिबिर उत्साहात अनेक मान्यवरांची उपस्थिती इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- ह...
फैजपूर युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा यांच्यावतीने रक्तदान शिबिर उत्साहात अनेक मान्यवरांची उपस्थिती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर : युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, शाखा फैजपूर यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होते तसेच ९० टक्के रक्तसंकलन पूर्ण झाले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नौशाद उस्मान साहेब, संभाजीनगर (औरंगाबाद) होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणीतून मानवता, बंधुभाव, परोपकार आणि गरजूंची मदत करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार शिरीष चौधरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जमाते ए इस्लामी हिंद, फैजपूर शहराध्यक्ष अब्दुल रऊफ जनाब साहेब यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार मानवता, बंधुभाव तसेच गोरगरीब आणि गरजूंसाठी कार्य करण्याचे महत्त्व यावेळी सांगितले
कार्यक्रमास डी.एन. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान. पोलीस सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील डी वाय एस ,पी अनिल बडगुजर साहेब, बी.डी. महाले सर, अशोक भालेराव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा फैजपूर शहराध्यक्ष शेख मोईन यांच्यासह एमपीजेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, पत्रकार बंधू, डॉक्टर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा फैजपूर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही सामाजिक मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments