adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे भगवान जिव्हेश्वर जयंती उत्साहात साजरी! साळी समाजाच्या आराध्य दैवताला भक्तिभावाने अभिवादन; समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

 फैजपूर येथे भगवान जिव्हेश्वर जयंती उत्साहात साजरी! साळी समाजाच्या आराध्य दैवताला भक्तिभावाने अभिवादन; समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती   ...

 फैजपूर येथे भगवान जिव्हेश्वर जयंती उत्साहात साजरी!

साळी समाजाच्या आराध्य दैवताला भक्तिभावाने अभिवादन; समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती 


 इदू पिंजारी फैजपुर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान जिव्हेश्वर महाराज यांची जयंती फैजपूर येथे भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी भगवान जिव्हेश्वर महाराजांचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.

पौराणिक कथेनुसार, भूतलावर मानवाची उत्पत्ती झाली, त्या काळात मानवाकडे शरीर झाकण्यासाठी वस्त्रांची व्यवस्था उपलब्ध नव्हती. मानवासाठी वस्त्रांची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर त्याला वस्त्र कोण उपलब्ध करून देणार, असा प्रश्न देवतांसमोर निर्माण झाला. त्यानंतर सर्व देवतांनी भगवान महादेवांकडे जाऊन मानवासाठी वस्त्रांची व्यवस्था करण्याची विनंती केली.

देवतांची विनंती मान्य करून भगवान महादेवांनी आपल्या जिव्हेतून एका बालकाची निर्मिती केली. या बालकाचे नाव भगवान जिव्हेश्वर असे ठेवण्यात आले. त्यानंतर वस्त्रनिर्मितीचे कार्य साळी समाजाकडे सोपविण्यात आल्याची श्रद्धा समाजामध्ये आहे. त्यामुळे भगवान जिव्हेश्वर महाराज हे साळी समाजाचे आराध्य दैवत मानले जातात.

भगवान जिव्हेश्वर जयंती देशभरातील साळी समाजाकडून मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरी केली जाते. फैजपूर येथेही यानिमित्ताने धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी श्री. बापू वैद्य व त्यांच्या अर्धांगिनी सौ. सुनीता वैद्य यांच्या हस्ते भगवान जिव्हेश्वर महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. पूजनानंतर उपस्थित समाजबांधवांनी भगवान जिव्हेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

या कार्यक्रमास साळी समाजाचे अध्यक्ष संतोष भाऊ भोगरे, सुभाष वैद्य, राजू वैद्य, अनिल वैद्य, नाना वैद्य, अप्पा वैद्य, पप्पू वैद्य, जगन काळे, संजय काळे, कला शिक्षक राजू साळी यांच्यासह चि. गौरव वैद्य, सक्षम वैद्य, सुजल वैद्य तसेच साळी समाजातील महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान जिव्हेश्वर महाराजांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा संपन्न झाला.

No comments