adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लोणवडीत ग्राम सुरक्षा दलाची सतर्कता पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावाच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता

 चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लोणवडीत ग्राम सुरक्षा दलाची सतर्कता पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावाच्या सुरक्षेसाठी वि...

 चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लोणवडीत ग्राम सुरक्षा दलाची सतर्कता

पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावाच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर :  तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोणवडी गावात सुरक्षेच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा दल व पोलीस पाटील यांच्याकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

गावात रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्तींची माहिती घेणे तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य गावाच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी गस्त घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

“गाव सुरक्षित तर प्रत्येक कुटुंब सुरक्षित” या भावनेतून ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता गावाच्या सुरक्षेसाठी सेवा बजावत आहेत. त्यांच्या या कार्याला पोलीस पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

गावातील नागरिकांनीही घराबाहेर ठेवलेल्या दुचाकी, शेती साहित्य व इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलीस पाटील किंवा संबंधित पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.लोणवडी ग्राम सुरक्षा दल व पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे गावाच्या सुरक्षिततेसाठी एकजुटीने प्रयत्न सुरू असून, त्यांच्या सेवाभावी कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

No comments