adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ.तु.ल.कोळंबे शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरी

 सौ.तु.ल.कोळंबे शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरी  प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक 29 ऑगस्ट शनिवार रोजी रक्षाब...

 सौ.तु.ल.कोळंबे शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरी 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 29 ऑगस्ट शनिवार रोजी रक्षाबंधन हा सण शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी फुलांनी, पानांनी तयार केलेली राखीचे डेकोरेशन करण्यात आले व कागदापासून राखी तयार करण्यात आली यासाठी श्रीमती प्रणिता चौधरी .श्रीमती आशा कोळी. श्रीमती प्रीती बावस्कर .श्रीमती निकिता राणे यांनी राखी डेकोरेशन केले. विद्यार्थिनींनी वर्गातच तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या विद्यार्थ्यांच्या हातावर बांधल्या व विद्यार्थ्यांनी आपल्या बहिणींसाठी छानसे गिफ्ट दिले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आदर आणि बंधू भावाची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे प्रमुख निकिता राणे मॅडम होत्या .रक्षाबंधन या सणाची माहिती श्री सचिन वराडे .यांनी सांगितली शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन ॲड रोहिणी ताई खडसे, श्री नारायण चौधरी, सेक्रेटरी डॉक्टर सी. एस. चौधरी.श्री पुरुषोत्तम महाजन, श्री महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले

No comments