मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली एकनाथराव खडसेंची सदिच्छा भेट.. अमृत महोत्सवानिमित्त शाल, श्रीफळ देऊन सन्मान; “खडसे हे महाराष्ट्रातील ...
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली एकनाथराव खडसेंची सदिच्छा भेट..
अमृत महोत्सवानिमित्त शाल, श्रीफळ देऊन सन्मान;
“खडसे हे महाराष्ट्रातील मोजक्या लोकनेत्यांपैकी एक” -बाळा नांदगावकर
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. बाळा नांदगावकर यांनी मुक्ताईनगर येथे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदगावकर यांनी त्यांना शुभेच्छा देत शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी खडसे परिवारातर्फे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी मा. बाळा नांदगावकर यांचे शाल तसेच मुक्ताईची मूर्ती देऊन स्वागत व सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना मा. बाळा नांदगावकर यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. “महाराष्ट्रात मोजकेच लोकनेते आहेत आणि त्यापैकी एकनाथ खडसे हे एक लोकनेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या सोबत काम करण्याचे सौभाग्य मला मिळाले,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील अनुभव, जनसामान्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे योगदान यांचा उल्लेख करत नांदगावकर यांनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खडसे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
या भेटीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर तसेच जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
मा. बाळा नांदगावकर यांच्या या भेटीमुळे खडसे परिवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील जुन्या स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा मिळाल्याचे यावेळी दिसून आले. जिल्हा अध्यक्ष ॲड जमील देशपांडे, उपजिल्हा अध्यक्ष विनोद पाठक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे,भुसावळ शहराध्यक्ष दीपक सोनवणे, मुक्ताई नगर तालुकाध्यक्ष मधुकर भोई, किरण तळेले

No comments