वढोदा प्र यावल येथे सुरक्षा दलातील सेवानिवृत्त जवानाच्या हस्ते केले ध्वजारोहण भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :- भारतीय स्...
वढोदा प्र यावल येथे सुरक्षा दलातील सेवानिवृत्त जवानाच्या हस्ते केले ध्वजारोहण
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाकर आप्पा सोनवणे जि प गटनेते यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत वढोदा प्र. यावल यांच्या वतीने सरपंच व यावल तालुका अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र संदीप भैय्या सोनवणे व ग्रामपंचायत सूचनेनुसार भारतीय सैन्य दलात CRPF मेजर पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले महेलखेडी येथील उज्ज्वल महाजन यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी सरपंच संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . याप्रसंगी देश भक्ती गीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आनंद करण्यात आले तरी या ध्वजारोहण प्रसंगी उपसरपंच गोपाळ चौधरी व ग्रामसेविका अश्विनीताई त्रिभुवन व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद गावातील विविध आजी-माजी सरपंच उपसरपंचपदाधिकारी,विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी,सन्माननीय ग्रामस्थ बंधू – भगिनी या सर्वांनी उपस्थित होते

No comments