adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अकलूद : पोदार इंटरनॅशनल स्कूल, ...

 पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अकलूद : पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावळ येथे भारताचा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७.४५ वाजता शाळेच्या फुटबॉल मैदानावर  प्राचार्य श्री. सचिन बन्सोडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या सौ. रेखा मुळे, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा श्रुंगी आणि प्रशासकीय अधिकारी श्री. रामदास कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्चपास्ट, तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक मास पी.टी. सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. प्राचार्य श्री. सचिन बन्सोडे सर यांनी प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्य सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरविण्यात आले. तसेच पोदार प्रेपच्या शिक्षकांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांतील देशभक्तिपर भाषणे, समूहगायन, विविध देशभक्तिपर नृत्य, लघुनाट्य आणि एकल नृत्य सादर केले. संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गीताने कार्यक्रमात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण केले.

संपूर्ण कार्यक्रमातून  ‘देश प्रथम’, राष्ट्रप्रेम, एकता, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाचा  संदेश प्रभावीपणे देण्यात आला. शिक्षक, विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरला. आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments