पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल:...
पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल:- पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक श्री. एम.के. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयातील आरोग्य समिती मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. श्री.मोहनीश भोपे ग्रामीण रुग्णालय यावल वैद्यकीय अधिकारी, डॉ. सौ. वैशाली निकुंभ वैद्यकीय अधिकारी, श्री. उमेश येवले औषध निर्माता, सौ. उषा बाहे, श्री. वसंत संदानशिव यांच्या विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री. एम. के. पाटील सर, व उपप्राचार्य श्री.एस. इंगळे सर, पर्यवेक्षक श्री.व्ही.ए. काटकर सर, श्री.व्ही. टी. नन्नवरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री.डी.एस. फेगडे सर, श्री.पी.एन. सोनवणे सरांनी सत्कार केला. यानंतर इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी समिती प्रमुख प्रा. श्री. जी. बी. पाटील सर, सौ. आय. ए. रायसिंग मॅडम, श्री.जे. जे.अब्दुल सर, श्री. पी. जी. बडगुजर सर, सौ. यु. डी. पाटील मॅडम यांनी परिश्रम घेतले.

No comments