यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे दिप अमावस्या उत्सव संपन्न भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे दिप अमावस्या उत्सव संपन्न
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे दिप अमावस्या हा सण साजरा करण्यात आला. दि १२/८/२०२६ रोजी या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या रंजना महाजन उपस्थित होत्या. इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्या दिपाली धांडे तसेच सुपरवायझर राजश्री लोखंडे व इंग्लिश मिडीयमच्या सुपरवायझर गौरी भिरूड यांनी देखील उपस्थिती दिली. अध्यक्षांच्या हस्ते सरस्वती पूजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिप अमावस्ये निमित्त दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. दिव्यांच्या नयनरम्य प्रकाशाने शाळेचा परिसर प्रकाशमय झाला. कार्यक्रमाच्या प्रसंगी शिक्षिका कविता पाटील यांनी दीप अमावस्या निमित्त माहिती दिली. तसेच अध्यक्ष प्राचार्या संजना महाजन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दीप अमावस्येच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रिती भार्गव यांनी तर आभार प्रदर्शन सुवर्णा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाची मदत लाभली . असा हा सोहळा आनंददायी वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.
No comments