adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे "आंतरराष्ट्रीय युवा दिन" उत्साहात संपन्न

 समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे "आंतरराष्ट्रीय युवा दिन" उत्साहात संपन्न  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि. 12 ऑग...

 समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे "आंतरराष्ट्रीय युवा दिन" उत्साहात संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे "आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि समाजकार्य पंधरवाडा निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

         मा. रमेश पाटील सर (मुख्याध्यापक, महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, लासूर) यांनी "आजच्या काळातील युवकांसमोरील आव्हाने" या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी युवकांची आजच्या काळातील जबाबदारी, आपले कारियर, मोबाईलचा वाढता वापर, व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण, आईवडिलांचा आदर इ. विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

             यानंतर प्रा. डॉ. विनोद रायपुरे सर यांनी समाजकार्य पंधरवाडा मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच या सर्व विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचा विकास व्हावा हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. डॉ. राहुल निकम सर यांनी विद्यार्थ्यानी अधिक वाचन करावे आणि आपले ध्येय ठरवून त्या ध्येयानुसार वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, (कार्यक्रम अधिकारी), आभार प्रदर्शन प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे,(सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ ईश्वर सौंदाणकर, (प्राचार्य, समाजकार्य समाजकार्य महाविद्यालय, चोपडा ), प्रा. डॉ. आशिष गुजराथी,( उपप्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा) सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

No comments