जि. प. उर्दू मुलींच्या ‘स्पेलिंग बी’ उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जिल्...
जि. प. उर्दू मुलींच्या ‘स्पेलिंग बी’ उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्पेलिंग बी’ या शैक्षणिक उपक्रमांतर्गत जि. प. उर्दू मुलींची शाळा, रसलपूर येथे शालेय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी दिलेल्या नमुन्यानुसार विविध इंग्रजी शब्दांच्या अचूक स्पेलिंगचा सराव केला. शब्दसंपदा, उच्चार, स्मरणशक्ती तसेच इंग्रजी भाषेतील कौशल्य विकसित करण्यासाठी या उपक्रमाचा विद्यार्थिनींना मोठा फायदा झाला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख जावेद शेख अजीज यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक कमालुद्दीन हुसनोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने प्रत्येक वर्गातील विद्यार्थिनींचा नियमानुसार सहभाग घेऊन सराव व शालेय स्तरावरील स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी शिक्षक तबरेज सर, शरीफ सर, साबीर सर, शेख कमाल सर, इसाक सर, उस्मान सर व आसिफ तडवी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, उत्साह व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण झाली. बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात आपल्या ज्ञान-कौशल्याच्या बळावर पुढे जाण्याची प्रेरणा विद्यार्थिनींना मिळाली. शालेय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेसाठी निवड करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

No comments