ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न. लातूर, जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंग...
ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा क्रीडा शिक्षक श्री. शिंदे एस. व्ही. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. शिंदे एस. व्ही. व श्री. बिराजदार एस. एस. यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व व मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी धावण्याच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी ते सातवी मुले गटात अंश्मन ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी प्रथम, यादव स्वप्नील उमेश यांनी द्वितीय, तर करमुडे अनिरुद्ध महादेव यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात जाधव संस्कृती कमलाकर यांनी प्रथम, येरोळे नंदिनी पंढरी यांनी द्वितीय, तर गायकवाड जान्हवी बाळासाहेब यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
इयत्ता आठवी ते दहावी मुले गटात सुरज अनिल शिडोळे यांनी प्रथम, अचवले ओमकार नरसिंग यांनी द्वितीय, तर संस्कार शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात श्रद्धा माधव यादव यांनी प्रथम, चिंते प्रांजली अनिल यांनी द्वितीय, तर सूर्यवंशी मयुरी लक्ष्मण यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments