adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय, अनवर्दे-बुधगाव येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

 पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय, अनवर्दे-बुधगाव येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव शामसुंदर सोनवणे वि.प्र. (स...

 पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय, अनवर्दे-बुधगाव येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव


शामसुंदर सोनवणे वि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अनवर्दे-बुधगाव : ग्रामविकास शिक्षण मंडळ, अनवर्दे-बुधगाव तालुका चोपडा संचलित पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय, अनवर्दे-बुधगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे आज १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व कवी तात्यासाहेब उमराव भाऊराव बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन दादासाहेब प्रवीण सुभाषराव साळुंखे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. व्हाईस चेअरमन तात्यासाहेब ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक दादासाहेब रवींद्र अरुण सोनवणे, दादासाहेब गजानन शिवाजी बोरसे, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, माजी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व ध्वजगीत तसेच देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि चित्रकला परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

एसएससी बोर्ड परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या प्राची सैंदाणे, द्वितीय क्रमांक स्वप्नील शिरसाठ व तृतीय क्रमांक पूजा बहारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या पाच विद्यार्थ्यांना बुधगाव येथील पालक कै. अशोक नाटू साळुंखे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी ग.भा. प्रभावती अशोक साळुंखे यांनी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. यामध्ये विपुल गणेश साळुंखे (८२.६६%), पृथ्वीराज रामचंद्र शिरसाठ (७६%), वैभव गणेश साळुंखे (७३.३३%), भूपेश कैलास शिरसाठ (७०%) व वैभव मनोज तायडे (६९.३३%) यांचा समावेश आहे. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, ज्येष्ठ सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बळवंत सोनवणे सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी ते करिता शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

No comments