adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा महाविद्यालयातील डॉ प्रा. क्रांती क्षीरसागर यांच्या विकसीत क्रीडा क्षेत्रातील पेटंटला केंद्र सरकारची मान्यता; वेटलिफ्टिंग खेळाडूंसाठी विकसित बेल्टला मिळाले नोंदणीकृत डिझाईन प्रमाणपत्र

चोपडा महाविद्यालयातील डॉ प्रा. क्रांती क्षीरसागर यांच्या विकसीत  क्रीडा क्षेत्रातील पेटंटला केंद्र सरकारची मान्यता; वेटलिफ्टिंग खेळाडूंसाठी ...

चोपडा महाविद्यालयातील डॉ प्रा. क्रांती क्षीरसागर यांच्या विकसीत 

क्रीडा क्षेत्रातील पेटंटला केंद्र सरकारची मान्यता; वेटलिफ्टिंग खेळाडूंसाठी विकसित बेल्टला मिळाले नोंदणीकृत डिझाईन प्रमाणपत्र




चोपडा प्रतिनिधी  

(संपादक : हेमकांत गायकवाड)


वेटलिफ्टिंग खेळाडूंसाठी विकसित करण्यात आलेल्या विशेष बेल्टच्या अभिनव डिझाईनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून (The Patent Office, Government of India) अधिकृत डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. संशोधक डॉ.प्रा क्रांती संदेश क्षीरसागर यांनी विकसित केलेल्या " बेल्ट फाॅर वेटलिप्टींग प्लेअर्स (Belt for Weightlifting Players)" या डिझाईनची नोंदणी डिझाईन क्रमांक 483810-001 अंतर्गत करण्यात आली असून, यामुळे भारतीय क्रीडा संशोधन क्षेत्रात आणखी एक उल्लेखनीय यश नोंदवले गेले आहे.

सदर डिझाईनची नोंदणी १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून, भारत सरकारच्या डिझाईन अॅक्ट २००० व डिझाईन रूल्स २००१(Designs Act, 2000 व Designs Rules, 2001) अंतर्गत त्यास कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. या डिझाईन नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र २५ जून २०२६ रोजी जारी करण्यात आले.

वेटलिफ्टिंग खेळाडूंच्या कंबरेला योग्य आधार मिळावा, दुखापतींचा धोका कमी व्हावा तसेच कामगिरी अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने या बेल्टचे अभिनव डिझाईन विकसित करण्यात आले आहे. या डिझाईनला मिळालेली नोंदणी ही संशोधन, नवोपक्रम आणि क्रीडा विज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.

या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. एड. संदीप सुरेश पाटील, तसेच संस्थेच्या सचिव मा. डॉ सौ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य, डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य, प्राध्यापक, तसेच क्रीडा, शिक्षण व संशोधन क्षेत्रातून डॉ. क्रांती संदेश क्षीरसागर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी उपयुक्त संशोधनाला चालना मिळण्यास या यशामुळे निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

No comments