यावल शहराच्या विकासासाठी सात कोटींच्या अल्पसंख्याक निधीची मागणी भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल शहरातील भाजपा व राष्ट्रवाद...
यावल शहराच्या विकासासाठी सात कोटींच्या अल्पसंख्याक निधीची मागणी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी आज आमदार अमोलदादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभा शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. यावेळी यावल शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी ₹७ कोटींचा विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
या भेटीदरम्यान कदीर खान — कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक उमेश फेगडे, तसेच नगरसेवक बाळासाहेब फेगडे आणि भाजपाच्या गटनेत्या नंदाताई महाजन यांचे चिरंजीव ऋतिक महाजन उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच यावल शहरातील अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. या निधीमुळे यावल शहरातील अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

No comments