adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुखी धरण ओरफ्लो फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या हस्ते विधिवत जलपूजन

 सुखी धरण ओरफ्लो फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या हस्ते विधिवत जलपूजन  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तापी परिसर...

 सुखी धरण ओरफ्लो फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या हस्ते विधिवत जलपूजन 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तापी परिसरातील महत्त्वाचे जलस्त्रोत असलेल्या सुखी धरणाने पूर्ण क्षमतेने भरून ओवर फ्लो झाल्याने फैजपूर शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या या धरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धरण परिसरात जलपूजन व ओटी भरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून जलस्त्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचे महत्व जपण्याचा संदेशही देण्यात आला. 

सुखी धरण वर्षभर भरलेले राहावे शहरासह परिसरातील नागरिकांना मुबलक व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे तसेच परिसरात सुख-समृद्धी आणि भरभराट नांदावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. दामिनी पवन सराफ आणि पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्री नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते विधिवत जलपूजन आणि ओटी भरण करण्यात आले. पारंपारिक धार्मिक विधी आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष पप्पू चौधरी फैजपूर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सकी धरण हे फैजपूर शहराचे जीवनदायीनी असल्याचे सांगत शहराच्या पाणीपुरवठ्यात या धरणाचे अनन्यसाधारण योगदान असल्याचे अधोरेखित केले. भविष्यातही या जलस्त्रोतांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

No comments