adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

'आंबेडकर सांस्कृतिक सभागृहासाठी निर्णायक एल्गार.. १२ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा'.. ४० वर्षांपासून समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळींचे केंद्र असलेल्या जागेच्या हस्तांतरणासाठी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम.

 'आंबेडकर सांस्कृतिक सभागृहासाठी निर्णायक एल्गार.. १२ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा'.. ४० वर्षांपासून समाजाच्या सामाजिक-सांस्कृति...

 'आंबेडकर सांस्कृतिक सभागृहासाठी निर्णायक एल्गार..

१२ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा'..

४० वर्षांपासून समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळींचे केंद्र असलेल्या जागेच्या हस्तांतरणासाठी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम. 


     लातूर, जि. प्र.(उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निलंगा शहरातील अशोकनगर   येथील गायरान जमीन सर्वे क्रमांक १७३ मधील २०० बाय १८० फूट जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी नगर परिषदेकडे हस्तांतरित करून संबंधित ७/१२ उताऱ्यावर आवश्यक नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अंकुश ढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, निलंगा यांना निवेदन सादर केले आहे. 

या मागणीवर आठ दिवसांच्या आत निर्णय न झाल्यास १२ ऑगस्ट २०२६ पासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनानुसार, संबंधित जागेचा वापर गेल्या सुमारे चार दशकांपासून आंबेडकरी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी सातत्याने होत आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज यांच्यासह विविध महामानवांच्या सार्वजनिक जयंती, सामाजिक कार्यक्रम आणि जनजागृतीचे उपक्रम याच ठिकाणी नियमितपणे आयोजित करण्यात येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

नगर परिषदेनेही या परिसरात सुमारे २०० झाडांची लागवड केली असून, त्याच सर्वे क्रमांकात विविध समाजांच्या स्मशानभूमींची शासनाकडे नोंद आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर आंबेडकर सांस्कृतिक सभागृहासाठीही जागेची अधिकृत नोंद करून ती नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत होईल, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांमध्ये सामाजिक प्रबोधनाची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक सभागृहाची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, १२ ऑगस्टपासून प्रस्तावित बेमुदत उपोषणामुळे या प्रश्नाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

No comments