आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समितीच्या मलकापूर तालुका अध्यक्षपदी कैलास धाडे अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकव...
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समितीच्या मलकापूर तालुका अध्यक्षपदी कैलास धाडे
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी, कोळी ढोर जमातीची संघर्ष समितीच्या मलकापूर तालुका अध्यक्षपदी आ. कैलास विष्णू धाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय सुरवसे यांच्या आदेशानुसार तसेच डॉ. मनोहर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी देण्यात आले.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या संघर्षमय विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासोबतच संघटनेच्या वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची जबाबदारी कैलास धाडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी व कोळी ढोर जमातीच्या न्याय्य हक्कांसाठीच्या संघर्षात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन नियुक्तीपत्रातून करण्यात आले आहे.
कैलास धाडे यांच्या नियुक्तीबद्दल पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments