यावलमध्ये ‘विश्व बंधुत्व रक्तदान महाअभियान’ उत्साहात संपन्न भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्...
यावलमध्ये ‘विश्व बंधुत्व रक्तदान महाअभियान’ उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, भुसावळ रोड, यावल यांच्या वतीने ब्रह्माकुमारीजच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणिजी यांच्या १९ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त ‘विश्व बंधुत्व रक्तदान महाअभियान’ आयोजित करण्यात आले. मानवतेची सेवा आणि विश्व बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या रक्तदान शिबिरासाठी रेड क्रॉस रक्तपेढीची टीम उपस्थित होती. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अरविंद चौधरी, लॅब टेक्निशियन दीक्षा पाटील, सुनील पावरा, जनसंपर्क अधिकारी सुषमा भालेराव, प्रयोगशाळा सहाय्यक मंगेश ओतारी तसेच अन्वर खान यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.
शिबिराला यावल शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बालसंस्कार शाळेचे मुख्याध्यापक गर्गे सर, माळीज क्लासेसचे संचालक कैलास माळी, सम्राट मॉलचे मालक तथा वाढोदा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे, दिव्य मराठीचे वार्ताहर शेखर पटेल, सकाळचे माजी वार्ताहर राजू कवडीवाले, नितीन बारी सर, सागर पाठक, हेमंत देशमुख, भूषण नेमाडे, संजय जोगी, राकेश धनगर, महेंद्र सापकर, किरण सोनवणे, जितेंद्र वारे, सौ. प्रतिभा वारे, सौ. रोशनी वारुळकर आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत ‘रक्तदान—सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. रक्तसंकलनाची प्रक्रिया शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना रेड क्रॉस रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ब्रह्माकुमारी राजश्री दीदीजी, संचालिका यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानातून मानवता, सेवा, सहकार्य आणि विश्व बंधुत्वाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. दादी प्रकाशमणिजी यांच्या पुण्यस्मृतीला मानवसेवेच्या माध्यमातून वाहिलेली ही श्रद्धांजली समाजासाठी प्रेरणादायी ठरली.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत वारूळकर, संदीप यादव, रागिनी चोपडे, लता सोनार, लता राजपूत, भावना बारी, माधुरी राणे, सुनंदा सूर्यवंशी, सिंधू सूर्यवंशी, सागर यादव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल ब्रह्माकुमारीज संस्थेच्या वतीने सर्व रक्तदाते, मान्यवर, रेड क्रॉस रक्तपेढीची टीम आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

No comments