adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रसूलपूर येथे ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस; हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनोखी मिसाल

  रसूलपूर येथे ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस; हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनोखी मिसाल रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रा...

 रसूलपूर येथे ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस; हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनोखी मिसाल


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील रसूलपूर येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भव्य जुलूस मोठ्या उत्साहात व शांततेत काढण्यात आला. या जुलूसात हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी हिंदू पंच कमेटीच्या वतीने मुस्लिम बांधवांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हिंदू बांधवांनी मुस्लिम पंच अध्यक्ष अय्यूब पहलवान यांचा तसेच उपस्थित मुस्लिम बांधवांचा सत्कार केला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा कार्यक्रम सामाजिक एकता, बंधुभाव आणि सलोख्याची अनोखी मिसाल ठरला.

या स्वागत कार्यक्रमास सुरेश  धनके, माजी शिक्षण सभापती पी. के. महाजन, उपसभापती दिलीप धनके, माजी सरपंच सुभाष वानखेडे, माजी सरपंच अनिल चौधरी, माजी सरपंच उमाकांत महाजन सर, रमजीपूर, समाधान सांवळे, प्रशांत वाणी, पांडू पाटील, बक्षीपूर, रमेश चौकसे सुनील महाजन बंड्डू मेंबर प्रवीण पोलीस पाटील, समीर तडवी, पोलीस पाटील रमजीपुर राहुल महाजन, पु. पाटील; विजय पु. पाटील यांच्यासह अनेक हिंदू बांधव उपस्थित होते.

तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने माजी सरपंच हनीफ पहलवान, कल्लू पहलवान, समद सेठ, अलीम हाजी साहेब, मनिहार इस्माईल खान, पपाया वाले इस्माईल पहलवान, सलीम मेंबर, कुतुबुद्दीन सेठ, फारूक पहलवान, असलम पहलवान, नूरिया पहलवान, साबीर सेठ, फारूक सेठ, इसाक बैग, अय्यूब साडीवाले, सय्यद असलम, कलीम सेठ, शब्बीर भाऊ, माजी डेप्युटी सरपंच, असलम तडवी, पोस्टमास्तर, मनू पठाण, युसूफ तडवी, राजू सेठ, व्यापारी, तस्लीम कुरेशी, बिस्मिल्लाह खान, जब्बार तडवी, मेंबर, जावेद बैग यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांचा सत्कार करण्यात आला.

जुलूसादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे पीएसआय मनोज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पो हे कॉ सिकंदर  तडवी, पो कॉ योगेश पाटील पो कॉ शुभम काळे यांनी आपली सेवा बजावली. त्यांच्या सहकार्यामुळे जुलूस अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दिलेला एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश रसूलपूरच्या या ईद-ए-मिलादुन्नबी जुलूसातून अधोरेखित झाला.

No comments