adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निलंगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडव्होकेट फोरमची स्थापना

 निलंगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट फोरमची स्थापना.  लातूर,जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक - हेमकांत गायकवाड) निलंगा : निलंगा येथील अ...

 निलंगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट फोरमची स्थापना. 


लातूर,जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक - हेमकांत गायकवाड)

निलंगा : निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत विधीज्ञांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड. लहू माणिकराव सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस जिल्हा सचिव ॲड. गणेश कांबळे, उपाध्यक्ष ॲड. यशवंत चव्हाण, ॲड. दीपक माने, ॲड. उद्धव कांबळे यांच्यासह अनेक विधीज्ञ उपस्थित होते.

बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट फोरमची निलंगा न्यायालयासाठी नूतन कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गोरगरीब, वंचित व गरजू नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देणे तसेच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी फोरमच्या माध्यमातून कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष ॲड. लहू सुरवसे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी फोरम कार्य करेल. गोरगरीब व गरजू नागरिकांना कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यानंतर उपस्थित विधीज्ञांच्या एकमताने निलंगा न्यायालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट फोरमची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी ॲड. शिवराज कांबळे, उपाध्यक्षपदी ॲड. सुलक्षण धैर्य, महिला उपाध्यक्षपदी ॲड. वैष्णवी कांबळे, सचिवपदी ॲड. विक्रांत सूर्यवंशी, सहसचिवपदी ॲड. परमेश्वर हंबर्डे, कोषाध्यक्षपदी ॲड. विलास शिंदे, सहकोषाध्यक्षपदी ॲड. अमोल ढेरे यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. धनराज धैर्य, ॲड. जयपाल बनसोडे, ॲड. राजाराम कांबळे आणि ॲड. बाळासाहेब बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल निलंगा न्यायालयातील विधीज्ञ मंडळींनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व कायदेशीर कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments