साखर झाली कडू! दरवाढीचा गोडवा कुणाच्या खिशात? शेतकरी मात्र उपेक्षितच ! लातूर, जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) साखरेच्य...
साखर झाली कडू! दरवाढीचा गोडवा कुणाच्या खिशात? शेतकरी मात्र उपेक्षितच !
लातूर, जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
साखरेच्या किरकोळ दराने गेल्या महिनाभरात मोठी उसळी घेतली असून काही बाजारांत साखर ७५ ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मात्र साखरेच्या या दरवाढीचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला किती मिळतो, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साखरेचा बाजारभाव वाढला म्हणून उसाचा दर त्याच प्रमाणात तो काही वाढत नाही. २०२५-२६ हंगामासाठी केंद्राने १०.२५ टक्के रिकव्हरीसाठी ₹३,५५० प्रति टन एफआरपी निश्चित केली आहे.
महाराष्ट्रात ३१ जुलै अखेर १७१ कारखान्यांनी एफआरपी पूर्णपणे दिली असली तरी ३९ कारखान्यांकडे सुमारे २२५६ कोटींची एफआरपी थकीत असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. दरम्यान, गुजरातमध्ये काही कारखान्यांनी ₹४,७०० पेक्षा अधिक ऊसदर दिल्याची उदाहरणे आहेत, तर तामिळनाडूने एफआरपीवर राज्य प्रोत्साहन देऊन ऊसदर ₹४,००० प्रति टनापर्यंत नेला आहे. व त्यामुळे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील वाढलेल्या साखर दराचा योग्य वाटा कधी मिळणार आहे. हा सवाल आता उपस्थित केला जात आहे. साखर महागली, पण शेतकऱ्याच्या उसाचा भाव आणि थकीत एफआरपीचा प्रश्न अजूनही अनुत्तरित व कायम आहे.
No comments