adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बोदवड तहसीलदार डी. पी. सपकाळे याचेवर झालेल्या भ्याड हल्यातील आरेापीना कटक करा- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पोलीस अधिक्षकाना निवेदन

बोदवड तहसीलदार डी. पी. सपकाळे याचेवर झालेल्या भ्याड हल्यातील आरोपींना कटक करा- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन जळगांव...

बोदवड तहसीलदार डी. पी. सपकाळे याचेवर झालेल्या भ्याड हल्यातील आरोपींना कटक करा-

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन




जळगांव प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 27 जुलै 2026 रोजी शासकीय कर्तव्य बजावत असताना बोदवडचे तहसीलदार, यांच्यावर वाळू माफियांकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी व त्याचे साथीदाराना अद्याप अटक करणेत आले नाही त्यामुळे वेळ न दडवता उर्वरीत आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करणे मागणी बाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संलग्न सर्व शाखेचे नाशिक विभागीय रविंद्र तायडे व इतर पदाधिकारी यांनी जिल्हापेालीस अधिकाकडे एका निवेदना द्वारे केली. या पुर्वी जळगांव कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संलग्न सर्व शाखेचे वतीने जिल्हाधिकारी यांचेकडे 30.7.2026 रोजी निवेदन देण्यात आली आहे मात्र या प्रकरणात काहीच कारवाई झालयाचे दिसुन येत नाही. 

     शासकीय कर्तव्या बजावत असतांना अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील प्रमुख बोदवडेचे तहसीलदार श्री.डी.पी.सपकाळे यांचेवे 27 जुलै 2026 रोजी केलेला प्राणघातक हल्याचा कास्ट्राईब कर्मचारी संघटना तीव्र निषेध करीत आहे. संदर्भीय पत्रान्वये कास्ट्राईब संघटनेने दोषीवर वाळू माफीयांना कठोरे कारवाई करणेसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे मात्र अद्याप उर्वरीत आरोपी मोकाट आहेत.

              अवैध वाळू वाहतूक प्रकरणात अवैध वाळू उपसा व चोरी रोखण्यासाठी महसुल विाभगातील कर्मचारी अधिकारी आपल्या जीवाची परवा न करता कर्तव्य बजावत असतात मात्र त्यांना शासना कडून पुरेश संरक्षण मिळत नसल्याचे बोदवड तहसीलमध्ये घडलेल्या प्रकरणावरुन अधोरेखीत झाले.. तहसीलदार श्री.डी. पी. सपकाळे याचेवर झालेल्या प्राण घातक हल्यात एक आठवडा संपूनही अजूनही मुख्य ओरापीना पकडण्यात पोलीसाना यश आले नसल्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष राविंद्र तायडे यांनी 3.8.2026 रोजी पोलीस अधिक्षक यांचे अनुपस्थितीत अप्पार पोलीस अधिक्षकाची भेट घेऊन निवेदन दिले.महसुल प्रशासन ,पोलीस विभागा कडून कडक कारवाई होत नसल्याने वाळू माफीयाची हिम्मत वाढली आहे हे अत्यंत चिंता जनक आहे.

सदर प्रकरणातील अधिकारी हे मागासवर्गीय (अनु जाती) या प्रवर्गातून येतात ते प्रामाणिकपणे आपली शासकीय जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या जातीचा व पदाचा राग धरून कर्तव्यावर अडथळा आणण्याच्या उद्देशाने हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अधिका-यावरच हल्ला झाल्यामुळे महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.जळगांव जिल्हयात या घटना वांरवार घडत असुन काही गुंड प्रवृत्तीच्या वाळू माफीयांना राजकीय संरक्षण मिळत असल्याने या घटना वांरवर घडत आहे.

कर्तव्यावर असतांना वांरवार कर्मचा-यावर हल्ले होत असतील तर कर्मचा-यांच्या मनोधर्यावर परिणाम होऊन शासकीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकरता येत नाही अशा प्रकारच्या घटनांवर तातडीने व कठोर कारवाई न झाल्यास समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळण्याचा धोका असून भविष्यात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रभावी व तातडीची कारवाई होणे अत्यावश्यक आहे.

         प्रसार माध्यमावर व्हारल झालेल्या दृष्यातील हल्लयाची तीव्रता पाहता या कटातील मुख्य आरोपी व इतराना न पकडता त्याना वाचविण्याचा प्रयत्ना होत आहे का याची सत्यता तपारसुन जे फरार आरोपी आहे त्यांनातात्काळ अट करुन भा.न्या स.कलमातील जास्तीत जास्त कलमे लावुन कडक कारवाई करावी. तसेच श्री.डी.पी.सपकाळे तहसलीदार हे मागासवर्गीय (अनु जाती) या प्रवर्गातून येत असल्याने वाळू माफीयांवर अन्याय अत्याचार प्रतिबंध 1989 चे कलम कलम ३(१)(r) आणि ३(१)(s) तसेच कलम ३(२)(va): नुसार कलमे वाढवून गुन्हे नोंदवून कायदेशिर कडक कारवाई करणेत यावी असे निवेदनात नमुद आहे.

No comments