adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या तडवी समाज बहुउद्देशीय हॉलची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी नगरसेवक हकीम तडवी यांचे नगराध्यक्षा दामिनी सराफ यांना निवेदन; पाणी, स्वच्छता, वीज व गेटच्या समस्यांकडे वेधले लक्ष

 फैजपूरच्या तडवी समाज बहुउद्देशीय हॉलची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी  इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर शहरातील इ...

 फैजपूरच्या तडवी समाज बहुउद्देशीय हॉलची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी


 इदू पिंजारी फैजपुर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरातील इस्लामपुरा भागात तडवी समाज बांधवांसाठी असलेल्या बहुउद्देशीय हॉलची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या हॉलची तातडीने दुरुस्ती व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रभाग क्रमांक १ (अ) चे नगरसेवक हकीम तडवी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी फैजपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांना सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी लेखी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, इस्लामपुरा परिसरातील तडवी समाजाचा बहुउद्देशीय हॉल सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. हॉलमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही, साफसफाईची व्यवस्था अपुरी आहे, परिसरात दिवाबत्तीची सुविधा नाही तसेच इलेक्ट्रिक व्यवस्था देखील नादुरुस्त आहे. त्याचबरोबर हॉलच्या खालच्या बाजूचे दोन्ही गेट तुटलेले असून ते पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत.

समाजातील विविध कार्यक्रम, बैठका व इतर सामाजिक उपक्रमांसाठी या हॉलचा उपयोग केला जातो. मात्र, सध्याच्या दुरवस्थेमुळे समाजबांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हॉलची पाहणी करून इमारतीची आवश्यक दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, दिवाबत्ती तसेच तुटलेल्या गेटची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक हकीम तडवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ, मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, इंजिनियर राकेश बहिराम, राजू आदी उपस्थित होते.

No comments