एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वढोदा येथे वृक्षारोपण भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुका प्रतिनिधी पर्यावरण संवर्धना...
एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वढोदा येथे वृक्षारोपण
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुका प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने राबविण्यात येणाऱ्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत यावल तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त वढोदा येथे वृक्षारोपण करण्यात आले.
संदीप सोनवणे यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर (आप्पा) सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, रोजगार सेवक तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments