adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मंजाबाई महादू नारखेडे विद्यालयात 'मासिक ऋतुचक्र व वैयक्तिक स्वच्छता' विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न 'समज... गैरसमज...' उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जनजागृती

  मंजाबाई महादू नारखेडे विद्यालयात 'मासिक ऋतुचक्र व वैयक्तिक स्वच्छता' विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न 'समज... गैरसमज...' उपक...

 मंजाबाई महादू नारखेडे विद्यालयात 'मासिक ऋतुचक्र व वैयक्तिक स्वच्छता' विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न

'समज... गैरसमज...' उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जनजागृती  


प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय, रुईखेडा येथे विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी "मासिक ऋतुचक्र (मासिक पाळी) व वैयक्तिक स्वच्छता" या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.

यावेळी रुईखेडा येथील सरकारी दवाखान्याच्या सीएचओ डॉ. पल्लवी तळले यांनी विद्यार्थिनींना मासिक ऋतुचक्रादरम्यान घ्यावयाची स्वच्छतेची काळजी, संतुलित आहार, आरोग्यदायी सवयी, प्रचलित गैरसमजांचे निरसन तसेच किशोरवयीन आरोग्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. वाय. सोनवणे यांनी डॉ. पल्लवी तळले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या मनोगतात त्यांनी अशा प्रकारचे आरोग्यविषयक मार्गदर्शन विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती योगिता ज्ञानदेव झांबरे यांनी केले. त्यांनी डॉ. पल्लवी तळले यांचा परिचय करून देत विशाखा समितीअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामागील उद्देश, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य जागरूकतेचे महत्त्व आणि वैयक्तिक स्वच्छतेची आवश्यकता याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती बबिता तडवी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तसेच विद्यार्थिनींनी या मार्गदर्शनाचा दैनंदिन जीवनात अवलंब करून निरोगी व आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. वाय. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाखा समितीच्या श्रीमती योगिता ज्ञानदेव झांबरे व श्रीमती बबिता तडवी यांनी केले. विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे हे सत्र ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.

No comments