adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निपुण भारत व संच मान्यतेवर भर द्या : गट विकास अधिकारी अंजली बर्गे विद्यार्थी हितासाठी कार्य करा; शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास प्राधान्य द्या : गटशिक्षणाधिकारी अजित पाटील

 निपुण भारत व संच मान्यतेवर भर द्या : गट विकास अधिकारी अंजली बर्गे विद्यार्थी हितासाठी कार्य करा; शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास प्राधान्य द्य...

 निपुण भारत व संच मान्यतेवर भर द्या : गट विकास अधिकारी अंजली बर्गे

विद्यार्थी हितासाठी कार्य करा; शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास प्राधान्य द्या : गटशिक्षणाधिकारी अजित पाटील

अखिल चोपडा तालुका महिला प्राथमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीने घेतली विविध अधिकाऱ्यांची भेट 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आलेल्या अखिल चोपडा तालुका महिला प्राथमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीने बुधवारी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनेचे अधिकृत पत्र व कार्यकारिणीची यादी सादर केली.

नूतन कार्यकारिणीने सर्वप्रथम ग्रामीण पोलीस स्टेशन, चोपडा येथील पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर तहसीलदार थोरात साहेब, गट विकास अधिकारी सौ. अंजली ताई बर्गे तसेच गटशिक्षणाधिकारी अजित पाटील यांची भेट घेऊन संघटनेच्या आगामी कार्याबाबत चर्चा केली.

यावेळी गट विकास अधिकारी सौ. अंजली बर्गे यांनी महिला शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीशी सकारात्मक संवाद साधला. त्यांनी निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तसेच संच मान्यता या महत्त्वपूर्ण विषयांवर विशेष भर देऊन शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर गटशिक्षणाधिकारी अजित पाटील यांनी नूतन कार्यकारिणीशी सविस्तर चर्चा केली. केवळ शिक्षकांच्या प्रश्नांपुरते संघटनेचे कार्य मर्यादित न ठेवता विद्यार्थी हित, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व व गुणवत्ता टिकविणे यासाठी संघटनेने सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे महिला शिक्षकांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, असे अध्यक्षा रेखा पाटील यांनी सांगितले.

यावेळी संघटनेच्या अध्यक्षा रेखा पाटील, सरचिटणीस मीनाक्षी पाटील, कोषाध्यक्षा प्रतिभा पाटील, कार्यालयीन चिटणीस प्रियंका निकम, उपाध्यक्षा प्रिती प्रभाकर भावसार, उपाध्यक्षा नयना वानखेडे, उपाध्यक्षा सुजाता सैदाणे, विभाग अध्यक्ष भारती हिरे, कविता पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शिका कल्पना पाटील यांच्यासह नूतन कार्यकारिणीच्या सदस्यांची उपस्थिती होती.

विद्यार्थी हित, शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षकांच्या सकारात्मक सहभागातून चोपडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम करण्याचा संकल्प महिला शिक्षक संघाने व्यक्त केला.

No comments