अडावद येथे गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सण-उत्सव काळात सामाजिक सलोखा व शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन खलील तडवी/ रविंद्र क...
अडावद येथे गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
सण-उत्सव काळात सामाजिक सलोखा व शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन
खलील तडवी/ रविंद्र कोळी अडावद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद : आगामी काळात साजरे होणारे विविध सण व उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावेत, यासाठी अडावद पोलीस स्टेशन येथे श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते तसेच पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा भाग, चोपडा हे उपस्थित होते. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा व शांतता अबाधित ठेवण्याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सण-उत्सवाच्या कालावधीत अफवा अथवा गैरसमज पसरविणाऱ्या कोणत्याही बाबींवर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
तसेच उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी. परिसरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
बैठकीस गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, पत्रकार तसेच संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंदाजे १७५ ते २०० सदस्यांनी बैठकीस उपस्थिती नोंदवली.
आगामी सण-उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

No comments