फोटोग्राफर म्हणजे समाजाचे नाक, कान आणि डोळे : डीवायएसपी सुनील पाटील चोपड्यात जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात चोपडा...
फोटोग्राफर म्हणजे समाजाचे नाक, कान आणि डोळे : डीवायएसपी सुनील पाटील
चोपड्यात जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : शहरातील नारायणवाडी परिसरात जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. फोटोग्राफी क्षेत्रातील छायाचित्रकारांचा गौरव आणि या कलेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. पंकज पाटील यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डीवायएसपी सुनील पाटील, नगराध्यक्षांच्या वतीने त्यांचे सासरे रवींद्र पाटील, उपनगराध्यक्ष पंकज भैया बोरोले, सहाय्यक गटविकास अधिकारी अनिलकुमार विसावे, उद्योजक विश्वनाथ भाऊ अग्रवाल, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, जिजाबराव नेरपगारे, प्रमोद कंखरे भोईसर, दीपक बारी, विशाल गुप्ता, सुशांक डिजिटलचे संचालक छोटू उर्फ भगवान वारडे, तसेच कवी रमेश जे. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटोग्राफी क्षेत्रात महिलांनीही पुढे यावे : तहसीलदार थोरात
यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले की, आज बहुतांश ठिकाणी तरुण कार्यकर्ते फोटोग्राफी क्षेत्रात पुढे येत आहेत. मात्र, महिलांनीही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज आहे. फोटोग्राफी ही केवळ छायाचित्र काढण्याची कला नसून ती काळाच्या आठवणी जतन करणारी महत्त्वपूर्ण कला आहे. आता फोटोग्राफी क्षेत्रही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे, असे त्यांनी सांगितले.
फोटोग्राफर हे पोलिसांचे नाक, कान आणि डोळे : डीवायएसपी पाटील
डीवायएसपी सुनील पाटील यांनी फोटोग्राफरच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, फोटोग्राफर हा समाजाचे नाक, कान आणि डोळे आहे. जगाच्या नजरेसमोर एखादी घटना आणण्याचे महत्त्वपूर्ण काम छायाचित्रकार करतो. पोलिसांनाही विविध घटनांच्या तपासादरम्यान वारंवार फोटोग्राफरच्या मदतीची आवश्यकता भासत असते. त्यामुळे फोटोग्राफी क्षेत्राचे समाजात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष पंकज भैया बोरोले, प्रमोद कंखरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी रमेश पाटील यांनी अस्सल मराठी भाषेत प्रभावीपणे सादर केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचे व पाहुण्यांचे छायाचित्रकार व आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी योगेश राजपूत, अजहर तेली, युनुस शेख, विनोद जाधव, अशपाक तेली, अकलेश माळी, ज्ञानेश्वर सैंदाणे, शाहरुख शेख, प्रशांत चांदे, जावेद शेख, विनोद मोरे, शाकीर शेख, मनीष चौधरी, ऋषिकेश पाटील, मोसिन शेख, दर्शन सोनार, गणू कलाल, चंद्रकांत पाटील, सचिन बडगुजर, तारीख शेख, नाना सोनगिरे, लीलाधर कोळी, विनोद पाटील भोकर, हेमकांत देवराज, संजय सोनवणे, प्रकाश पवार, कुणाल महाजन, भरत पाटील, योगेश शर्मा, कृष्णा जाधव, रामचंद्र कोळी, जयेश कोळी, सुदर्शन पाटील, योगेश कोळी, दीपक पाटील, साहिल बाविस्कर, निखिल सोनार, लीलाधर पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संदीप पाटील यांनी केले. फोटोग्राफी क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देणारा आणि या कलेचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

No comments