adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री गणेश सार्वजनिक वाचनालयाने अनेक तरुणांना वाचनाने समृद्ध केले- वाचनालयाच्या वार्षिक सभेत शरद महाजन यांचे प्रतिपादन

 श्री गणेश सार्वजनिक वाचनालयाने अनेक तरुणांना वाचनाने समृद्ध केले-  वाचनालयाच्या वार्षिक सभेत शरद महाजन यांचे प्रतिपादन   इदू पिंजारी फैजपूर...

 श्री गणेश सार्वजनिक वाचनालयाने अनेक तरुणांना वाचनाने समृद्ध केले- 

वाचनालयाच्या वार्षिक सभेत शरद महाजन यांचे प्रतिपादन  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाने अनेक तरुणांना वाचनाने समृद्ध केले आहे. तसेच अनेक शिक्षक घडविले आहेत. वाचनालयाने केलेले कार्य सर्वांसाठी आदर्श व अनमोल आहे. वाचनालयाने अद्यावत बांधकाम करून सर्व सोयी युक्त सुविधा असलेली तीन मजली इमारत पूर्ण केली असून ही बाब अतिशय आनंदाची आहे असे प्रतिपादन तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  शरद महाजन यांनी श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या ३६  व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाची वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या  अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष हेमकांत गाजरे  होते. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन , लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे व्हाचेअरमन प्रवीण वारके, शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयंत बेंडाळे, संचालक हर्षद महाजन, संदेश महाजन, भाजपा फैजपुर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे, स्वामीनारायण मंदिराचे कोठारी बी जी इंगळे, विलास बेंडाळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शब्दसुमनांनी करण्यात आले. नंतर संस्थेचे मयत सभासद, शहीद झालेले जवान ,थोर नेते ,साहित्यिक, शास्त्रज्ञ यांना दोन मिळून स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

         संस्थेचे सभासद प्रवीण भास्कर वारके यांची यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्हाचेअरमन पदी निवड झाल्याबद्दल, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालिका सौ. स्वीटी उमेश बेंडाळे  आणि सौ. जोत्स्ना त्र्यंबक इंगळे यांनी गीतापठण मध्ये ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव मिळवत यशाचे शिखर गाठल्याबद्दल या तिघांचा सत्कार शाल , पुष्प व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.मागील  सभेचे प्रोसिडींग वाचन ग्रंथपाल ललित इंगळे यांनी केले. अजेंड्यावरील विषय वाचन अध्यक्ष यांनी करून सर्व विषय एक मताने मंजूर करण्यात आले.

       सभेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष हेमकांत गाजरे, उपाध्यक्ष शरद चोपडे, सचिव युवराज तळेले, सहसचिव ललित कुमार फिरके, कोषाध्यक्ष चेतन इंगळे, संचालक प्रवीण वारके, नितीन चौधरी, मिलिंद बेंडाळे, गंगाराम वाघुळदे, प्रशांत बोरोले, यांच्यासह ग्रंथपाल ललित इंगळे, लिपिक सौ. कविता इंगळे, शिपाई भास्कर भोगे, यादव वाघुळदे, किरण गाजरे, महेंद्र बेंडाळे ,घन: श्याम गाजरे, देवेंद्र  बेंडाळे,  रवींद्र इंगळे, चंद्रकांत चौधरी, जीवन चौधरी, दोधू तळेले व सभासदांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन युवराज तळेले आणि आभार ललितकुमार फिरके यांनी मानले.

No comments