कै. विठ्ठलराव धुमाळ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीची राज्यस्तरीय रेडरन स्पर्धासाठी निवड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्...
कै. विठ्ठलराव धुमाळ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीची राज्यस्तरीय रेडरन स्पर्धासाठी निवड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या हस्ते सत्कार.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा : येथील कै.विठ्ठलराव धुमाळ कनिष्ठ महाविद्यालयातील शुभांगी धाकुडे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय रेडरन स्पर्धेसाठी निवड झाली असून या निवडीबद्दल संस्थेचे संस्था अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ऐआयडीएस नियंत्रण तथा सर्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन एचआयव्ही एआयडीएस जनजागृती उपक्रमाअंतर्गत नुकत्याच झालेल्या रेडरन स्पर्धेत या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय स्पर्धेत दुसरा येण्याचा मान मिळवला. यामुळे या विद्यार्थिनीचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
रविवारी 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय रेडरन स्पर्धा होणार आहे.
कै. विठ्ठलराव धुमाळ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. शुभांगी वसंत धाकूडे हिची निवड झाल्यामुळे लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष पंडितराव धुमाळ, सचिव सौ. प्रतिभाताई धुमाळ, समन्वयक पांडुरंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंगा तालुका अध्यक्ष हरीभाऊ साळुंके अतुल शिंदे,प्राचार्य बळीराम लामतुरे आदींकडून या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.व या निवडी बद्दल शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्तरावरून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments